Wednesday 22 February 2017

                             विज्ञान आश्रम प्रकल्प 

                         विभगाचे नाव :- फूड-लॅब 

                    प्रकल्पाचे नाव :-गुलाबजामून बनवणे 

                 विध्यार्थ्याचे नाव :- सागर राजगुरू .गोरख हारके 

उददेश:-

 साधने:-  खवा,साखर,मैदा, इलायची पावडर  इत्यादी .....

साहित्य :- पातीले ,चमच ,मोठी प्लेट , कढई इत्यादी ......

कृती :- पहिल्यांदा खावा आणि मैदा मिक्स करून घ्यावे .नंतर इलायची पावडर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यावे .मिक्स झाल्यावर त्या पीठाचे गोळ्या तयार करा .नंतर त्या गोळ्या गरम तेलात भाजून घ्या ,नंतर त्या गोळ्या साखरेच्या पाकात 2 तास मुरण्यासाठी ठेवा 

                  

Wednesday 1 February 2017

गृह आणि आरोग्य विभाग

प्रकल्प २०१६-१७

1.    प्रस्तावना :
    विविध सण यात्रा उत्सव अशा प्रसंगांचे ऐतिहासिक –सामाजिक महत्व तर आहे.या काळात तयार होणार्या वस्तू पदार्थ यांची फार मोठी व्यावसायिक साखळी तयार होत असते.कच्चा माल आणण्यापासून ते विक्री पर्यंत अनेक टप्पे यांत सामाविस्त होत असतात.हे टप्पे अभ्यासण्यासाठी सामोसे व टिक्की यांचे उत्पादन करणे व विक्री करणे गृह उद्योग विभागासाठी निवडला.

2.    महत्व आणि गरज :
    लोकांच्या चवीनुसार त्यांना नाष्टा उपलब्ध करून देणे.लोकांच्या आवडीनुसार त्या उत्पादनामध्ये बदल करून त्यांचे आरोग्यावर चांगल्याप्रकारे परिणाम करणारे घटक प्रोटीन कॅलरीज यांचे प्रमाण महत्वाचे असते.हे पॅकींग फूड ग्राहक विक्री करतो,हि गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प केला.

3.    उददेश :
    अन्नपदार्थातून प्रोटीन कॅलरीज जीवनसत्वांचे प्रमाण कसे राखावे अन्नपदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी काय करावे अन्नपदार्थ पॅकेजींग करून मार्केटिंग कसे करावे हे पूर्ण शिकणे हे उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प केला.

4.    प्रकल्पाची निवड :
     ग्राहकांची बेकारी उत्पादन व चटपटीत नास्ता या दोघांचे एकत्रित करून तयार होणारे प्रोडक्ट ग्राहकांना आवडेल व त्या अन्न पदार्थांचे महत्व आणि गरज लक्षात घेऊन हा प्रकल्प तयार केला.

5.    अपेक्षित कौशल्ये :
(१)अन्नपदार्थ बनवण्यासाठीत्यांची पूर्ण माहिती होती
(२)सामोसे व टिक्की यांची चव कशी राखावी व त्यात कोणते घटक मिसळून ते आणखी स्वादिष्ट बनवायचे हे माहित होते म्हणून आम्ही हा प्रकल्प निवडला.                       
6.    साधने :
गॅस  सुरी प्लेट कढई चमचा पोळपाट लाटणे  पॅकेजींग मशीन ईत्यादी.....

7.    साहित्य :
    मैदा साखर तूप तेल फरसाण चिंचेची चटणी शेंगदाणे वेलची गुल पांढरे तील गाजर बटाटे बित ढोबळी मिरची मेथी मीठ पाणी ईत्यादी....

8.    उत्पादनाची नावे :
(१)            पट्टी सामोसे           (५) नमकीन टिक्की 
(२)            नमकीन सामोसे        (६) चटपटी टिक्की
(३)            व्हेज सामोसे           (७) व्हेज टिक्की
(४)            बाकरवडी             (८) तीळ बाकरवडी

प्रोडक्ट्स मधील सारण करण्याची कृती :-
१.पट्टी समोसे २.बाकरवडी ३.तीळ बाकरवडी ४. चटपटा टिक्की
फरसाण एका भांड्यामध्ये घेतला त्यामध्ये चिंचेची चटणी ,बडीशेप,धने टाकले आणि हलवून सारण तयार केले.
१.नमकीन समोसे २. नमकीन टिक्की
गूळ बारीक करून शेंगदाणे मिक्सर मधु बारीक करून घेऊन त्यामध्ये एक फ्लेवर टाकला आंनी थोडी पिठी साखर टाकून मिश्रण तयार केले.


१.व्हेज समोसे २.व्हेज टिक्की
भाज्यांचे तुकडे करून त्या खरपूस टाळून घेतल्या त्यामध्ये चिंचेची चटणी,शेंगदाणे,आणि थोडे फरसाण टाकून मिश्रण तयार केले.
समोसे ,टिक्की,बाकरवडी,बनव्यासाठीची पीठ मळण्याची कृती:
मैदा वजन करून घेतला त्यामध्ये थोडे जिरे,मीठ,व तेल व तूपगरम करून घातले, व पिठाचा गोळा बनवून घेतला. अशाप्रकारे पीठ माळून घेतले.

समोसे बनवणे:
१.    पीठाचे गोळे करून त्याच्या पट्ट्या तयार केल्या त्यामध्ये सारण भरून समोसे बनवले. नमकीन समोसे साखरेच्या पाकात बुडवून ठेवले.

टिक्की बनवणे :

१.    गोळे बनवून पिठाची वाटी तयार केली, त्यामध्ये सारण घालून तीकीचा आकार दिला व नमकीन टिक्की साखरेच्या पाकमध्ये बुडवून ठेवली.

बाकरवडी बनवणे :


१.    पिठाची पोळी तयार करून त्यावर फरसाण पसरवून त्याला गोल गोल रोल करून मध्ये मध्ये त्याचे काप करून बाकरवडी तयार केली.आणि तळून घेतली.